चतुरस्त्र गायिका स्व. माणिक वर्मा यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची कन्या राणी वर्मा यांच्या तर्फे आदरांजली - रविवार १६ मे २०२१
Mummy ... Today is your 95 th Birth Anniversary ... Happpppy Birthdayy!!
All music lovers know your valuable contribution in the Indian Classical & Light music, who still worship you not only as a Singer- par excellence but also respect you as a humble, modest & simple soulful Human being. Yes you have earned it !!
I am sure, wherever you may be, you are still looking over us, your 4 Daughters & family, with same love, affection & care. No words are enough to tell you how much I love & miss you ... Mummy ❤❤❤❤
Interview of we 4 sisters on Mummy & family - Courtesy of "Presicion Gappa" by Presicion Foundation & Uttara Mone.
Video Courtesy- Vijay Joshi, Pune
स्व. माणिक वर्मा यांच्या जन्मदिनानिमित्त 'नाट्यगीतरंग' तर्फे आदरांजली - रविवार १६ मे २०२१ , सकाळी ९.००
स्व. माणिक वर्मा यांच्या जन्मदिनानिमित्त गायिका संपदा माने यांच्यातर्फे आदरांजली - १६ मे २०२१
स्व. माणिक वर्मा यांच्या जन्मदिनानिमित्त श्री. केशव साठये यांच्यातर्फे आदरांजली - १६ मे २०२१
'अमृताहुनी गोड' हे गाणे जेव्हा आपल्या कानी पडते तेंव्हा , 'नाम तुझे देवा' याबरोबरच , हे स्वरही अमृताहून गोड आहेत अशीच भावना गान रसिकांची होते .'इथेच आणिक या बांधावर' हे शब्द जेव्हा आपल्या कानात रेंगाळायला लागतात तेंव्हा ती श्यामल वेळ हुरहूर वाढवते ,ती त्यातील आर्ततेमुळेच.
या भक्तिपूर्ण आवाजातून प्रत्यक्ष प्रभुरामचंद्रांना शेले विणताना आपण पाहतो तेव्हा भक्तांसाठी परमेश्वर काहीही करायला तयार असतो अशी नादमय प्रचिती आपल्याला येते. साखर आणि मध यांची अप्रतिम मिश्रण गळ्यात करुनच परमेश्वराने त्यांना पृथ्वीवर पाठवले असावे.
'चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा .... या ओळी ताटातूट आणि विरह याचा सांगावाच घेऊन येतात.'त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग' ही होणारी घालमेल अस्वस्थ करणाऱया सुरेल स्वरातून येते तेव्हा सैरभैर होणे म्हणजे काय याचा वस्तुपाठचा आपल्याला मिळतो. एकदा ग दि माडगूळकराना विचारले गेले --मराठीत ळ हे अक्षर निरुपयोगी आहे. काही कुठे उपयोग नाही त्याचा .. यावर उत्तर म्हणून गदिमांनी 'घन निळा लडिवाळा' हे गीत लिहून आपले शब्द प्रभुत्व दाखवले आणि या गायिकेने आपल्या मधाळ आवाजाने त्या 'ळ'ची नजाकत दाखवली .
'जाळीमंदी पिकली करवंद' सारखी लावणी ठसक्यात गाऊन या गायिकेने शांत स्निग्ध दिवा, वेळप्रसंगी रंगमहालातील झुंबरही प्रकाश मान करु शकतो हे दाखवून दिलं . गाणं फक्त सूरतालातून व्यक्त होत नाही, त्याला स्वरभावाचा स्पर्श लागतो. हा परिसस्पर्श या गान माणिकेने आपल्या साऱ्याच गाण्यांना दिला. स्वरांच्या ऋतुचक्रात भावनांचा वसंत फुलवला.
शास्त्रीय संगीतात ही गायिका नावाजलेली होती. जगन्नाथबुवा पुरोहित ,इनायत खा साहेब ,सुरेशबाबू माने अशा दिग्गज गुरुंनी रागदारीचा स्वरसाज या गळ्यावर चढवला. माणिक वर्मा या गायिकेला आजच्या तिच्या जयंती निमित्त(जन्म १६ मे ,१९२६ ) विनम्र अभिवादन !
"माणिककन्या" - 7th November 2020
महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका माणिक वर्मा यांच्या कलेच्या वारसा पुढे नेणारा बहारदार कार्यक्रम..."माणिककन्या".
प्रिसिजन फाउंडेशन तर्फे सादर "प्रिसीजन गप्पा" कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या चार सुकन्या - वंदना गुप्ते, भरती आचरेकर, राणी वर्मा व अरुणा जयप्रकाश यांच्याशी दिलखुलास गप्पा!
मुलाखतकार - उत्तर मोने.
शनिवार दि. ७ नोव्हेंबर २०२०, सायंकाळी ६.१५ वाजता, प्रिसिजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर.
या मातीतील सूर : अमृताहुनी गोड…
Loksatta 5th July 2020
|
|
|
"अमृताहुनी गोड" - 16th May 2020.
माणिक वर्मा यांच्या ९५व्या जयंती वर्षारंभानिमित्त त्यांच्यावरील विशेष कार्यक्रम ‘अमृताहुनी गोड’ शनिवारी सकाळी ११ वाजता ‘जीवनगाणी युट्युब चॅनेल’वर महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध व लाडक्या गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या ९५व्या जयंती वर्षारंभानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘अमृताहुनी गोड’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन विशेष अशा व्यासपीठावर म्हणजे ‘युट्युब चॅनेल’च्या माध्यमातून होणार आहे. वंदना गुप्ते, राणी वर्मा आणि सिस्टर कन्सर्न एन्टरटेन्मेंट निर्मित आणि ‘जीवनगाणी’ प्रस्तुत हा कार्यक्रम शनिवारी १६ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता ‘जीवनगाणी युट्युब चॅनेल’च्या माध्यमातून आयोजित केला गेला आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात ओंकार दादरकर, नीलाक्षी पेंढारकर, मुग्धा वैशंपायन, शिल्पा पुणतांबेकर हे आघाडीचे कलाकार माणिक वर्मा यांची गाजलेली गाणी सादर करणार आहेत. गिरीश ओक, अतुल परचुरे, प्रशांत दामले आणि सुनील बर्वे हे चित्रपट-रंगभूमीवरील कलाकार लेखांचे वाचन करणार आहेत. प्रख्यात अभिनेत्री मधुरा वेलणकर कार्यक्रमाचे निवेदन करणार आहे.
तसेच कार्यक्रमाची खासियत म्हणजे माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे, पंडित भीमसेन जोशी, श्रीमती किशोरी अमोणकर, श्री. सुधीर फडके ,श्रीमती शोभा गुर्टू, अशा
काही जेष्ठ मान्यवरांनी आपल्या आठवणी यात सांगितल्या आहेत.
माणिक वर्मा यांचे ९५वे जयंती वर्ष सुरु झाले असून त्यानिमित्ताने हे आयोजन केले गेले आहे .
कार्यक्रमाची संकल्पना- दिग्दर्शन वंदना गुप्ते आणि राणी वर्मा यांचे असून प्रसाद महाडकर त्याचे संयोजक आहेत. ‘माणिक वर्मा प्रतिष्ठान’ आणि ‘चौरंग’चे विशेष योगदान या कार्यक्रमाला लाभले आहे. या कार्यक्रमासाठी ‘स्मृतिगंध’ डिजिटल पार्टनर असणार आहे.
‘अमृताहुनी गोड’ या कार्यक्रमाचे तीन भाग सादर होणार आहेत. आजही महाराष्ट्रातील रसिकांना माणिक वर्मा यांच्या आवाजाची मोहिनी आहे. रसिकांना ‘जीवनगाणी’चे ‘युट्युब चॅनेल’ उघडून त्याला सबस्क्राईब करत सहभागी होता येईल.
नमस्कार! आमची आई आणि महाराष्ट्राची लाडकी गायिका, माणिक वर्मा, हिचे दि. 16 मे 2020 रोजी 95 व्या जयंती वर्षात पदार्पण होत आहे. त्या निमित्ताने आम्ही चौघी बहिणी, रसिकांसाठी, अनेक कलाकारां सोबत आईला एक संगीतमय आदरांजली वाहणार आहोत.....
" अमृताहूनि गोड " - भाग 1, 2 व 3 ... अर्थात Online .. YouTube च्या माध्यमातून !!!
सकाळी 11 वाजता 'जीवनगाणी' च्या Youtube Link वर आपण याचा मनमुराद आनंद घ्यावा आणि आमच्या या सोहळ्यात सहभागी व्हाव हीच ईच्छा !!
- भारती, अरुणा, वंदना , राणी
अमृताहूनी गोड | भाग १
|
अमृताहूनी गोड | भाग २
|
अमृताहूनी गोड | भाग ३
|
|
Reviews
Maharashtra Times 22 May 2020
|
Pudhari 22 May 2020
|
|
"Baharala Parijat Dari" - 10th July 2016.
"Baharala Parijat Dari" - A unique programme of Kathak dance based on the timeless melodious songs and "bandishes" of Smt. Manik Varma. Conceptualized and produced by Abha Vamburkar and brought to us by Diksha Kathak dance academy.
"Baharala Parijat Dari" - short clip 1
|
"Baharala Parijat Dari" - short clip 2
|
Manik Varma Mahotsav - 2015 (16th - 18th May 2015)
"Shabda Sur Barave" - A musical programme to commemorate the evergreen songs of popular singer Smt. Malati Pande Barve was presented by the Barve family - Priyanka, Rajeev, Sangita & Pranjali.
90th Birth Anniversary of Smt. Manik Varma
Prahar 16 May 2015
|
|
|
Manik Varma Smruti Puraskar - 2015
Manik Varma Smruti Puraskar for the year 2015 was conferred upon
Pt. Rajan Mishra & Pt. Sajan Mishra on 29th March 2015.
Pandit Rajan and Sajan Mishra are renowned singers of Khayal singing of the Banaras gharana and are recipients of many prestigious awards such as Padma Bhushan, Sangeet Natak Akademi Award, Gandharwa National Award and National Tansen Samman.
Media Reviews on Padmashri Smt. Manik Varma's Website
17th Manik Varma Sangeet Mahotsav (17th -19th May, 2014)
Rangashrada Pratishthan presents
17th Manik Varma Sangeet Mahotsav from 17th - 19th May, 2014 at Yashwant Natyamandir, Matunga (W).
Saturday, 17th May 2014 at 4pm
Classical & semi classical vocal recital by renowned vocalist Shri. Anand Bhate.
Sunday, 18th May 2014 at 4pm
"Kasturigandh" - A musical programme of popular songs arranged by senior music arranger Shri. Appa Wadawkar.
Monday, 19th May 2014 at 4pm
"
Ye Mausam Hai Rangeen " - A musical programme based on the variety of Hindi songs in musical plays.
Manik Varma Smruti Puraskar - 2014
Well known singer,
Smt. Suman Kalyanpur was honored with the prestigious
Manik Varma Smruti Puraskar for the year 2014, by the hands of the greatest Flute artiste,
Pandit Hariprasad Chaurasiya ji on 16th April 2014. The award funcion was graced by Suman Kalyanpur ji's interview and glimpses of her melidious singing.
www.manikvarma.com was very successfully inaugrated by Pt. Hariprasad Chaurasiya ji with overwhelming response and appreciation from all music lovers present.
We are extremely happy to announce that from
2014 onwards, the same
"Manik Varma Smruti Puraskar" has been increased to
Rs. 25,000/-.